बोकडाच्या डोळ्यामुळे गमावला जीव
छत्तीसगड राज्यामधील सूरजपूर जिल्ह्यातील मदनपूरमध्ये बोकडाच्या डोळ्याने एका व्यक्तीचा बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे. गावातील 50 वर्षीय बागर रॉय बोकड / शेळी / बकऱ्यांची कत्तल करतात आणि त्यांचे मांस शिजवतात. जेव्हा त्याने बोकडाचा डोळा जेवताना खाल्ला. तो त्याच्या घशात अडकला. त्यानंतर त्याला गुदमरल्यासारखे झाले. गावकऱ्यांनी त्याची दखल घेत त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.