Crop Insurance List प्रधानमंत्री खरीप पिक विमा 2022 साठी राज्यातील 50 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. राज्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Crop Insurance List त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सरसकट पिक विमा मंजूर केला आहे. शेतकऱ्यांना खरीप पिक विम्याचे पैसे वाटप करण्यासाठी, सरकारने 2100 कोटी रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे. या विषयीचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे.
पीक विमा लाभार्थी यादी पाहण्यासाठी
राज्यातील 24 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत 942 कोटी रुपये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. तसेच पीक विम्याचे 1205 कोटी रुपये विमा कंपन्यांकडे शिल्लक राहिलेले आहेत. ही रक्कम अजून पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेली नाही.
ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजूनही खरीप पिक विम्याचे पैसे जमा केलेले नाहीत. त्यांच्या बँक खात्यात लवकर पिक विम्याचे पैसे जमा करा, अशी सूचना महाराष्ट्राच्या कृषी विभागामार्फत विमा कंपन्यांना दिलेली आहे.
त्यामुळे राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पिक विम्याचे पैसे विमा कंपन्यांकडून जमा केले जाणार आहेत.
खरीप पिक विम्याचे 1200 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात झाले जमा! तुम्हाला आले का? पहा येथे क्लिक करून.