IMD चा इशारा.. ‘या’ राज्यांमध्ये ढगफुटी
देशभरातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) देखील आणखी एक इशारा दिला आहे. येत्या तीन दिवसांत पर्वतीय भागात ढग फुटी होण्याची शक्यता वर्तविली आहे. ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागातील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन IMDच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.