land

आता या वेबसाईटवर जुने अभिलेख (फेरफार, सातबारा व खाते उतारे) असे पाहा….

aapleabhilekh.mahabhumi.gov.in सर्च करा.

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.

• या पेजवरील ई-रेकॉर्डस् पाहण्यासाठी e-Records (Archived Documents) या पर्यायावर केल्यावर “महाराष्ट्र शासन – महसूल विभाग’चे पेज समोर येईल.

• त्यात उजवीकडील “भाषा’ पर्यायावर क्लिक करून भाषा निवडा.

• त्यानंतर डाव्या बाजूच्या चौकटी “लॉगइन’ व ‘मदत’ ऑप्शन येईल. तुम्ही वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून साईटवर जाऊ शकता.

• नोंदणी केली नसेल “नवीन वापरकर्ता नोंदणी’वर क्लिक करा.

• त्यानंतर या पेजवरील वैयक्तिक माहिती भरा जसे की तुमचं नाव, मधलं नाव, आडनाव, लिंग, राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर आदी माहिती भरा.

• त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता, मेल-आयडी, बर्थ डेट ही वैयक्तिक माहिती भरल्यानंतर सविस्तर पत्त्याविषयीचे रकाने भरा.

• यानंतर लॉग इन आयडी तयार वेबसाईटच्या निर्देशानुसार लॉग इन आयडी तयार करा. निर्देशानुसार पासवर्ड टाका.

• त्यानंतर एका चौकटीतील कुठल्याही एका प्रश्नाचं उत्तर द्या.

• त्यानंतर पुढील चौकटीत दिलेली अक्षरे जसेच्या तसे Captcha चौकटीत टाईप करा. मग शेवटी सबमिट बटण दाबा.

• त्यानंतर स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा व लॉगइन करण्यासाठी, असा मेसेज येईल. यावरील “इथे क्लिक करा’वर क्लिक करा.

• आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं युजरनेम