1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

By Amit Agrawal

Published on:

land information

 

 

मित्रांनो जमिनीसंबंधीची आपल्याला कुठलाही व्यवहार करायचा असेल तर आपण पहिल्यांदा त्या जमिनीचा(land information) माहिती बघतो आणि मगच जो करायचा असेल तो व्यवहार आपण करतो म्हणजेच आपण ती जमीन कोणाची होती आता कुणाची आहे यासंबंधीचे पुरावे आपण बघत असतो.

 

हेही वाचा : तुमच्या शेतातही पक्का रास्ता बनणार, यादी जाहीर; आपले नाव चेक करा

 

चला तर मग ह्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला हीच माहिती किंवा जमिनीचा इतिहास किंवा पुरावा आपण (7/12 utara online)सातबारा, फेरफार(modification), खाते उतारा(Accounts drawn) 1880 पासून कसा शोधू शकतो ते बघुया.

आता हे खाते उतारे, सातबारा किंवा फेरफार आपण मूळ स्वरूपात असेल तसेच भुमि अभिलेख कार्यालयांमध्ये 1880 पासून उपलब्ध आहेत. तेही आपल्या सोयीकरता.

 

हे पण वाचा :  शेतकऱ्याने दीड एकरात बांधली दोन कोटींची विहीर, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

 

सरकारने आता ही माहिती ऑनलाइन देण्यसाठी सुरुवात म्हणून इ-अभिलेख कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळजवळ तीस कोटी जुने अभिलेख(Old records) आपल्या करता उपलब्ध करून देणार आहे.

ही माहिती आपण ऑनलाईन कशी बघू शकता तेही मोबाईल mobile द्वारे, लॅपटॉप Laptop किंवा पीसी PC  द्वारे आपल्याला कसे बघता येतील हे या लेखात बघणार आहोत.हे बघण्याकरता आपल्याला एक वेबसाईट Google वर सर्च करावी लागेल.

 

हे सुद्धा वाचा :  शेत जमीन अतिक्रमण असे काढा बांध कोरणाऱ्याला मिळेल कायमचा धडा.

 

aapleabhilekh.mahabhumi.gov.in अशा नावाने.

वेबसाइट ओपन झाल्यानंतर e-Records (Archived Documents) पहिल्या पेजवर homepage तुम्हाला असं लिहिलेला दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर नेक्स्ट विंडो ओपन होईल तुम्हाला तुमची भाषा निवडण्यासाठी तिथे पर्याय दिसेल भाषा निवडून झाल्यावर आपल्याला लॉगिन Log in करता येईल

 

जर या अगोदर आपण नोंदणी केलेली नसेल तर आपल्याला सर्वप्रथम तिथे नोंदणी करावी लागेल.  प्रथम आपल्याला वापर करता नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचा आहे.  त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल, त्यामध्ये आपली माहिती भरायची आहे जसे की आपले नाव, बाबाचे नाव आणि आडनाव.

त्यानंतर त्याखाली अंडर नेशनालिटी आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा व्यवसाय निवडायचा आहे. जसे की business/ service/ others जो तुमचा व्यवसाय असेल योग्य तो निवडून घ्या.

 

हे पण वाचा : शेतकऱ्यांसाठी पाईपलाईन अनुदान योजना | संपूर्ण माहिती | असा करा अर्ज

 

त्यानंतर तुमचा मेल आयडी, जन्मदिनांक लिहायचा आहे आणि शेवटी तुमचा पूर्ण पत्ता लिहावा लागेल,  ज्याही खाण्यामध्ये चांदणी दिसतील तो रकाना न सोडता आपणास पूर्ण भरावा लागेल.  पिनकोड टाकला की जिल्हा आणि राज्य आपोआप येईल अशाप्रकारे ही माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर, लोगिन-आयडी (Log in id) तयार करून घ्यावी लागेल.

तुमचा लॉगिन (Log in id)आयडी तपासून टाका, त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे.  स्वतःचा एक पासवर्ड  बनवून घ्या.  तुमच्या आठवणीत राहील असा बनवा, त्यानंतर तीन ते चार प्रश्नाची आपल्याला उत्तरे द्यायचे आहेत.

 

हे सुद्धा वाचा : अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन मजूर घेऊ शकणार शेत जमीन विकत, SBI करणार मदत..!

 

त्याचे प्रश्न सोपे आहेत त्या प्रश्नांपैकी एकाचे उत्तर द्या आणि ते लक्षात सुद्धा ठेवा,  म्हणजे तुमचा पासवर्ड तुम्ही विसरलात, तर तुम्हाला तो प्रश्न तिथे विचारला जाईल आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल.  तरच तुम्ही पुढील वेळेस पुन्हा लॉगिन करू शकाल.

त्यानंतर बाजूला दिसणारा Captcha तुम्हाला तिथे टाकायचा आहे. जे आकडे तिथे तुम्हाला दिसतात ते तिथे टाकून आता Submit बटन वर क्लीक करा.

 

हे झाल्यानंतर तुमच्यासमोर वापरकर्ता नोंदणी पूर्ण झालेली आहे असा मेसेज दिसेल.  त्यानंतर लॉगिन Log in यावर क्लिक करा, यानंतर तुम्ही जो यूजर आयडी बनवला होता तो युजर आयडी आणि पासवर्ड तिथे टाका.

यामध्ये आपण आपले सातबारा फेरफार खाते उतारा पाहू शकतो. सुरुवातीला आपण खाते उतारा कसा कडता येईल हे पाहूया.  सर्वात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे.

हा कार्यक्रम सध्या फक्त सात जिल्ह्यांसाठी आहे.  नंतर सर्व जिल्हे या मध्ये घेण्यात येणार आहेत.

 

नंतर आपला तालुका व गाव आणि अभिलेखाचा प्रकाराची निवड करायची आहे. आपण जर फेरफार उतारा निवडला असेल तर गट क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर  शोधा या बटनावर क्लिक करायचा आहे.

58 अभिलेख प्रकार यामध्ये देण्यात आलेले आहे पैकी तुम्हाला जो अभिलेख पाहिजे असेल त्यावर क्लिक केले की,  तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित खाते उतारा तुम्हाला दिसेल. फेरफार क्रमांक वर्ष दिलेला असतो, त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि संबंधित खाते उतारा तुमच्यासमोर ओपन होईल.  कार्ट मध्ये ठेवा असा पर्याय  तिथे येईल. त्यावर क्लिक केलं तुमच्यासमोर आपला खाते उतारा दिसून येईल.

 

तुम्हाला हा खाते उतारा डाऊनलोड करता येतो.  डाउनलोड झाल्यानंतर तुमच्यासमोर खाते उतारा दिसायला लागेल.  या जमिनीच्या उताऱ्यामध्ये अधिकार अभिलेख मध्ये काय बदल झाले कधी झाले याची माहिती आपल्याला लगेच समजून येईल.  त्याचप्रमाणे तुम्ही जर सातबारा हे ऑप्शन निवडले.

तर सांगितल्याप्रमाणे प्रोसेस करून तुम्ही सातबारा उतारा पाहू शकता. अशाप्रकारे मित्रांनो अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण 1880 पासून खाते उतारे, सातबारा आणि फेरफार ऑनलाइन आपण सहजपणे  बघू शकता.  डाऊनलोड करू शकता आणि त्याची कॉपी आपल्या जवळही ठेवू शकता.

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.

Leave a Comment

Close Help dada