Mazi Kanya Bhagyashri : शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र मध्ये मुलींचे शिक्षण आणि आरोग्य सुधारण्यासाठी, यासोबत त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, यासोबतच बालिका आपण भ्रुणहत्या रोखणे, समाजामध्ये मुलींच्या जन्मा बाबत सकारात्मक विचार तयार करणे, बालविवाह रोखणे, आणि या सोबतच मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे. अशा विविध गोष्टींसाठी सुकन्या योजना दारिद्र्य रेषेखालील जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी दिनांक 1 जानेवारी 2014 पासून कुटुंबातील दोन अपत्यांपर्यंत लागू करण्यात आले आहे. ही शासकीय योजना दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंबामध्ये जन्माला येणाऱ्या पहिल्या दोन अपत्य मुलींसाठी लागू करण्यात आले आहे. दारिद्र रेषेवरील एपीएल कुटुंबामध्ये जन्माला येणाऱ्या मुलांसाठी सुद्धा या शासकीय योजनेअंतर्गत काही महत्त्वाचे लाभ देण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या अंतर्गत दिनांक 7 – 12 – 2015 च्या इतिवृत्तात या शासकीय योजनेसाठी आवश्यक निधी बद्दल स्वातंत्र छाननी करून मुख्यमंत्री यांच्या मदतीने निर्णय घ्यावा अशे नमूद केले होते.
