mpsc Bharti एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पद भरती बाबत निर्णय

Mpsc Bharti अखेर ‘एमपीएससी’कडून (MPSC) गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातील 340 पदे वाढवण्यात आली आहेत. उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एमपीएससी’ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 11 मे 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, ही जाहिरात केवळ 161 पदभरतीची असल्याने परीक्षार्थीकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

स्पर्धापरीक्षांची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातून विद्यार्थी शहरात येतात. विशेषत: पुण्यात स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झाला होता. तसाच तो ‘एमपीएससी’वरही झाला. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे..

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

एकुन जागा

– गट ‘अ’

उपजिल्हाधिकारी – 33

पोलिस उपअधीक्षक – 41

सहायक राज्यकर आयुक्त -47

उपमुख्य कार्यकारी अधिकारी – 14

उपनिबंधक,सहकारी संस्था – 2

शिक्षणाधिकारी – 20

प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी) – 6

तहसीलदार – 25

गट ‘ब’

सहायक गटविकास अधिकारी – 80

उपअधीक्षक, भूमी अभिलेख – 3

सहायक निबंधक, सहकारी संस्था – 2

उपशिक्षणाधिकारी – 25

सहायक प्रकल्प अधिकारी – 42

एकूण – 340

राज्यातील 37 जिल्हा केंद्रावर उद्या (ता. 21 ऑगस्ट) राज्य सेवा पूर्वपरीक्षा होत आहे. या परीक्षेद्वारे महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये उमेदवारांची भरती केली जाणार आहे. परीक्षा होण्यापूर्वीच पदांची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांना आनंद व्यक्त केला आहे.

Close Help dada