महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत mpsc bharti online राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील गट ब आणि क संवर्गातील विविध पदांच्या एकूण ८१६९ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
विविध पदांच्या एकूण ८१६९ जागा
सहायक कक्ष अधिकारी पदांच्या ७८ जागा, राज्य mpsc bharti online कर निरीक्षक पदांच्या १५९ जागा, पोलीस उप निरीक्षक पदांच्या ३७४ जागा, दुय्यम निबंधक (मुद्रांक निरीक्षक) पदांच्या ४९ जागा, दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) पदांच्या ६ जागा, तांत्रिक सहायक पदाची १ जागा, कर सहायक पदांच्या ४६८ जागा आणि लिपिक-टंकलेखक ७०३४ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जानेवारी २०२३ पासून ते दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.